- काळाखडक परिसरात गुंडांची दहशत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२३) :- ” आमच्या भाईला बघायची तुझी लायकी आहे का? तु आमच्या भाईकडे का बघितले?”, असे जेवण करीत असताना फिर्यादी व त्यांच्या मित्राजवळ येऊन फिर्यादीच्या ओळखीचा आरोपी त्यांना म्हणाला. यावर फिर्यादी त्यास नाही बघितले असे म्हणाले. तरीही आरोपी आणि त्याचा साथीदार यांनी फिर्यादीला हॉटेलच्या बाहेर ओढत नेले. तेथे फिर्यादी यांना आरोपीने पकडले. आरोपीचा साथीदार ” मी कोण आहे तुला माहीत आहे का? ” असे म्हणत त्याने फिर्यादीला हाताने व लाथाबुक्क्याने मारायला चालू केले. त्यावेळी फिर्यादीने त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी आरडाओरडा केला असता आरोपींच्या दहशतीने तेथे असलेले लोक व फिर्यादीचे मित्र सैरावैरा पळून गेले. फिर्यादीच्या मदतीला कोणीही आले नाही. आरोपीच्या इतर तीन साथीदारांनीसुध्दा फिर्यादीला हाताने व लाथा बुक्क्यांनी मारायला चालू केले. दुसऱ्या आरोपीने फिर्यादीच्या तोंडावर जोरात फाईट मारुन त्यांना जखमी केले. तसेच चौथ्या आरोपीने फिर्यादीच्या गळयातील ६०,००० रुपये किंमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून घेतली. दुसऱ्या आरोपीने फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातील ३००० रुपये रोख रक्कम काढून घेतले. “मी या एरीयाचा भाई आहे, शाहरुख भाई आहे, अख्खं पिंपरी चिंचवड मला घाबरतंय, आणि तु मला नढतोय काय. तुला आता सोडत नाही ” असे दुसरा आरोपी फिर्यादीला म्हणाला. तेवढ्यात पाचव्या आरोपीने पॅन्टच्या मागील बाजूस ठेवलेला कोयता काढला. दुसऱ्या आरोपीने तो हातात घेवून जोरात ओरडला, थांब आता तुला सोडत नाही, तुला खल्लासच करतो. ते पाहून त्याच्या दहशतीने तेथील दुकानदारांनी आपल्या दुकानाचे दरवाजे बंद करुन घेतले. तसेच आसपासचे लोक सैरावैरा पळून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २४) रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास सना हॉटेल, काळाखडक झोपडपट्टी, वाकड येथे घडला.
फिर्यादी सागर अरुण कदम (वय १७ वर्षे, धंदा काही नाही, रा. जगताप नगर लेन नं २, थेरगांव) यांनी आरोपी बाळा लोखंडे (वय अंदाजे २५ वर्षे, रा. काळाखडक झोपडपट्टी वाकड), शाहरुख खान (वय अंदाजे २५ वर्षे), आनंद वाल्मिकी (वय अंदाजे २७ वर्षे), जुबेर खान (वय अंदाजे २० वर्षे), विष्णु कांबळे (वय अंदाजे २१ वर्षे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी आरोपींविरोधात १९५/२०२३ भादवि कलम ३९५, ३२३, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३, ७ नुसार गुन्हा दाखल करीत पहिल्या आणि दुसऱ्या आरोपीला अटक केली आहे.












