न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२३) :- क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने मराठी राजभाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार व शाळेतील पालक सुनील जाधव, निलांबरी गारसे व निमा परमार यांच्या हस्ते कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे व सरस्वतीचे पूजन करण्यात आले.
शर्वरी काटे, प्रियांशू मिश्रा, प्रिया वाघमारे, देवयानी काटे, दर्शन पाटील या विद्यार्थ्यांनी मराठीत भाषण केले. तसेच इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये गाणं म्हटले व इयत्ता पाचवी आणि सहावीच्या मुलांनी “गाणं लोककलेच लेन” हे मराठी गीत सादर केलं. निशा पवार यांनी मराठी कविता गाऊन मराठी भाषेला प्राधान्य दिले. शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांनी सूत्रसंचालन व निशा पवार यांनी आभार प्रदर्शन