न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२३) :- रिक्षा भरधाव वेगात चालवुन आरोपीने पायी चालत जाणाऱ्या वृद्धाला पाठीमागुन धडक दिली. त्यात गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यु झाला. अपघाताची माहिती न देता आरोपी रिक्षाचालक पळुन गेला. दामोदर तुकाराम कोंडे (वय ७६ वर्षे, रा. फ्लॅट नं १०२, सी बिल्डींग, पंचवटी हौसिंग सोसायटी, म्हस्केवस्ती) असे मयत वृद्धाचे नाव आहे.
आरोपी रिक्षाचालक वृद्धाच्या मृत्युस कारणीभुत झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. २५) रोजी रात्री ७.२० च्या सुमारास रावेत, म्हस्केवस्ती येथील हिल किस्ट, फेज २ सोसायटी समोरील रस्त्यावर घडली.
फिर्यादी शैला महेश कोंडे (वय ४० वर्षे, धंदा गृहणी, रा. फ्लॅट नं १०२, सी बिल्डींग, पंचवटी हौसींग सोसायटी, रावेत, म्हस्केवस्ती) यांनी आरोपी अज्ञात रिक्षा चालक (नाव पत्ता माहित नाही) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. रावेत पोलिसांनी आरोपी विरोधात ११५/२०२३ भा.द.वि कलम २७९, ३०४(अ) मो.वा.का.क १८४,१३४, १७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















