न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने जमावबंदी आदेश लागु होता. जमीनीच्या वादाच्या कारणावरुन आरोपीने फिर्यादीला हाताने मारहाण केली. शिवीगाळ, दमदाटी केली. सह आरोपी २ याने फिर्यादीचा मुलगा अनिकेत यालाही त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने डोक्यात व हातावर मारहाण केली, त्यामुळे मुलगा अनिकेत याच्या उजव्या हाताच्या कोपरातून रक्त आले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २६) रोजी दुपारी २.४५ वाजता किवळे येथील वृध्दाश्रमजवळ, जमीन गट नं ८१/१ येथे आरोपीच्या घराबाहेर घडला.
फिर्यादी हनुमंत पांडुरंग दांगट (वय ५५ वर्षे, धंदा शेती, रा. विठ्ठल रुक्मीणी मंदिरा पाठीमागे, किवळे गावठाण) यांनी आरोपी नंदकुमार पांडुरंग दांगट (वय ६३ वर्षे), शिवाजी नंदकुमार दांगट (वय २७ वर्षे, दोन्ही रा. वृध्दाश्रम किवळे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
रावेत पोलिसांनी दोघांच्या विरोधात ११८/२०२३ भादवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३)/१३५ नुसार गुन्हा दाखल करीत त्यांना सी.आर.पी.सी. ४१ (अ) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.
















