न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२३) :- सोशल मिडीयावरून फिर्यादीच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत आरोपीने मैत्री केली. फिर्यादीच्या पिडीत मुलीचा विश्वास संपादन करून तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिला दोन ठिकाणी नेऊन तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध निर्माण केले. त्यामुळे पिडीत मुलगी दिड महिन्याची गर्भवती राहिली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.०२/०१/२०२३ ते दि. २७/०१/२०२३) दरम्यान लांडगे चाळ, कासारवाडी व मोरया कॉलनी, चिंचवड येथील पहिल्या मजल्यावरील रुम नं १४ मध्ये घडली.
महिला फिर्यादीने आरोपी पृथ्वीराज जाधव (वय २० वर्षे, रा. सोलापुर) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी १८६/२०२३ भा.द.वि. कलम ३६३, ३७६, बालकांचे लैगीक अपराधांपासुन संरक्षणकायदा सन २०१२ चे कलम ३,४,५ (एल), ५(जे), (२).६ नुसार गुन्हा आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















