न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२३) :- करवीर इंडस्ट्रीज, तळवडे या कंपनीतून फिर्यादीच्या गाडीवर काम करणाऱ्या नोकराने एम.एस.सीट मेटल फिर्यादीच्या (एमएच१६सीसी०४७७) गाडीमध्ये लोड केले. ते रिलायबल अॅटो टेक प्रा.लि. चाकण येथे डिलीव्हरी करणे गरजेचे होते. मात्र, आरोपीने फिर्यादीची गाडी कोठेतरी आडबाजुला नेऊन त्या गाडीतुन एस.के.एफ कंपनीचे एचआरपी सीट मटेरियल कशाच्यातरी सहायाने काढून घेतले. ते फिर्यादीच्या तोंड ओळखीचा इसम दशरथ गराडे याच्या टेम्पो (एचएच१४ ६६९२) यामध्ये लोड करुन फिर्यादीच्या गाडीचा ड्रायव्हर आरोपी व दशरथ गराडे याच्या गाडीवरील ड्रायव्हर सह आरोपी २ हे दोघेही दशरथ गराडे यांचा दीड लाखांचा टेम्पो व त्यामध्ये लोड केलेला ३,०२,३४५ रुपये किंमतीचा माल असा एकुण ४,५२,३५४ रुपये किंमतीचा माल मोबाईल बंद करुन संगणमत करुन मालाची व गाडीची चोरी करुन निघुन गेले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २६) रोजी रात्री ११.०० नंतर ते (दि. २७) रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास फिझित्सो कंपनीजवळ तळवडे येथे घडली.
फिर्यादी तानाजी सोमाजी करपे (वय ४९ वर्षे, धंदा ट्रान्सपोर्ट व्यवसाय, रा. मु. मोई, फलकेवस्ती, जयगणेश तरुण मित्र मंडळ, पो. कुरुळी ता. खेड जि. पुणे) यांनी आरोपी सचिन त्रिपाठी (रा. वय २९ वर्षे रा. हिनौती पो. हिनौती ता. रामनगर जि. सतना राज्य मध्यप्रदेश), विजयकुमार (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. देहुरोड पोलिसांनी १५७/२०२३ भा.द.वी कलम ३८१,३४ नुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















