न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२३) :- तळेगाव-चाकण रस्ता, बजाज इलेक्ट्रीकल कंपनी समोर, महाळुंगे इंगळे येथील टपरीसमोर आरोपीने एकाकडून ३ किलो ६ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशिररित्या विक्रीसाठी जवळ बाळगला.
याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथक गुन्हे शाखा यांना माहिती मिळाली. त्यांनी (दि. २७) रोजी दुपारी २.१५ च्या सुमारास कारवाई करीत आरोपीला जेरबंद केले. त्याच्याकडून ७५,१५० रुपयांचा गांजा जप्त केला. त्याने हा गांजा पाहिजे सह आरोपी २ याच्याकडून आणला असल्याचे तपासात सांगितले.
कमलेश ज्ञानेश्वर भोसले (वय ३३ वर्षे रा. बजाज इलेक्ट्रीकल कंपनी शेजारी प्रदीप लॅमीनेटरर्स प्रा.लि. कंपनी समोर, तळेगाव चाकण रोड महाळुंगे इंगळे, ता.खेड जि.पुणे), पाहिजे आरोपी नितीन भोपळे (वय ३२ वर्षे, रा. मादलमोई पंचरत्न हॉटेलशेजारीता. गेवराई जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
















