न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड एमआयडीसीकडून पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर अँड डी दिघी, व्हीएसएनएल, कॅंटोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागातील पाणीपुरवठा गुरुवारी (दि. २) रोजी सकाळी ८ ते रात्री १० दरम्यान बंद राहणार आहे.
शुक्रवारी देखील पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. रावेत येथील अशुद्ध पाणी पुरवठा केंद्रातील देखभाल-दुरुस्तीचे काम असल्यामुळे हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शहरातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन चिंचवड एमआयडीसी प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
















