न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२३) :- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील नऊ पोलीस निरीक्षकांच्या नुकत्याच अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
यात जितेंद्र कदम (दिघी पोलिस ठाण्यातून गुन्हे शाखा युनिट-२), अरविंद पवार (भोसरी ठाण्यातून गुन्हे शाखा, खंडणी विरोधी पथक), सतीश नांदुरकर (गुन्हे शाखा, युनिट २ येथून वाहतूक शाखा), अजय जोगदंड (गुन्हे शाखा, खंडणी विरोधी पथक येथून वाहतूक शाखा), नितीन लांडगे (तळेगाव दाभाडे ठाण्यातून परकीय नोंदणी विभाग), राजेंद्रकुमार राजमाने व शंकर बाबर (विशेष शाखा एक येथून नियंत्रण कक्ष), दिगंबर सूर्यवंशी (देहूरोड पोलिस ठाणे, गुन्हे), तेजस्विनी कदम (निगडी पोलिस ठाणे, गुन्हे) यांचा समावेश आहे.
















