न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२३) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भोसरीतील ई- वेस्ट सेंटर येथे ई- कचरा संकलन व्हॅनचे उदघाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उप आयुक्त रविकिरण घोडके, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे, ईसीए चे सर्व टीम लीडर्स व ट्रस्टी विनिता दाते, डॉ. आशा राव, नताशा गांगल, हिरामण भुजबळ, ग्रीनस्केपचे रुपेश कदम आदी उपस्थित होते.


















