न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२३) :- व्यापा-याचे २० लाख रुपये लुटणा-या फरार आरोपीच्या देहुरोड पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. रूषीकेश उर्फ शेऱ्या राजु अडागळे (साईनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासुन देहुरोड पोलीस स्टेशन परिसरात वारंवार घडणा-या जबरी चोरी, घर फोडी, वाहन चोरी, सायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे, जबरी चोरी, वाहन चोरी, सायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या तपासासाठी आदेश दिले होते. त्यानुसार क्राईम मैपिंगनुसार चैन स्नॅनिंगच्या स्पॉटवर पेट्रोलिंग करण्याचे आदेश त्यांनी तपास पथकास दिले होते.
त्याप्रमाणे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे देहुरोड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रेलिंग करत होते. पो.शि. सचिन शेजाळ यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत रूषीकेश हा साईनगर, पाण्याच्या टाकीजवळ हातामध्ये तलवार घेवुन फिरत आहे, अशी माहिती मिळाली. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी देहुरोड पोलीस स्टेशन येथील तपास पथकाच्या दोन टिम तयार करण्यात आल्या. तपास पथकातीत अंमलदार यांनी साईनगर भागात मिळालेल्या बातमी प्रमाणे शोध घेतला. त्यावेळी आरोपी तपास पथकाला पाहून पळु लागला. टिमने त्याचा पाठलाग करुन त्यास शिताफीने पकडून त्याची अंगझडती घेतली. त्याच्या हातात एक तलवार व पॅन्टच्या आत कमरेला एक कोयता मिळून आला. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने दौंड येथे २ वर्षापूर्वी एका व्यापा-याचे २० लाख रुपये लुटल्याचे कबुल केले.
आरोपीवर देहुरोड पो.स्टे. येथे गुन्हा रजि. नं. १६०/२०२३ भा.द.वि कलम ४(२५) सह महा. पो. अधि. कलम ३ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहुरोड पोलीस स्टेशन, तसेच इतर पोलीस स्टेशनमध्ये दरोडा, जबरी चोरी, चोरी, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. निष्पन्न झाले आहे. तसेच तो दौड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ६१०/२०२१ भा.द.वि.स कलम ३९५,१२० (ब). २०१ या गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड विनय चौबे, सहा. पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ – २ डॉ. काकासाहेब डोळे, सहा. पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, देहुरोड विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे, सहा. पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड, पो. हवा. ७९४ प्रशांत पवार, पो. हवा. सामिल प्रकाश, पो.ना. १५१९ सुनिल यादव, पो.शि. २५०५ सचिन शेजाळ, पो. शि. २३७२ स्वप्रिल साबळे, पो.शि. २१८४ मोशिन अत्तार, पो.शि. १५०७ किशोर परदेशी यांनी केली आहे.