न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२३) :- खोलीसाठी आरोपीने पुरूष भाडेकरू आणला. फिर्यादीने पुरुष भाडेकरूसाठी आरोपीला विरोध केला. त्याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. आता तुला फाडतो, अशी धमकी देत तिथून निघून गेला. फिर्यादी हे एकटेच घरी पलंगावर आराम करीत टिव्ही पाहत होते. त्यावेळी आरोपी चिडून फिर्यादीच्या घरात घुसला. ‘ तुला आता खल्लास करतो ‘ असे म्हणत फिर्यादीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातातील चाकूने फिर्यादीच्या छातीच्या खाली पोटारवर जोरात वार करून फिर्यादीला गंभीर जखमी करीत पळून गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २६) रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास हनुमान मंदिराजवळ, जुन्या बाथरूमच्या पाठीमागे, गांधीनगर, नागराज भांडेकर यांची खोली, पिंपरी येथे घडली.
फिर्यादी महादेव मरिप्प्पा म्हेत्रे (वय ४२ वर्षे, धंदा बिगारी काम, रा. पिंपरी) यांनी आरोपी आक्का ऊर्फ राकेश काळूराम गोरखा (वय अंदाजे २७ वर्षे, रा. गांधीनगर, पिंपरी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी आरोपी विरोधात २५३/२०२३भा.द.वि. कलम ३०७,४५२,५०४,५०६, महा. पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.












