न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ मार्च २०२३) :- चिखली भागातील मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगर पालिका अरुण दगडे यांना दिनेश यादव यांनी लेखी निवेदन दिले. यावेळी प्रकाश चौधरी उपस्थित होते.
चिखली परिसरात कुदळवाडीत मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्री फिरत असतात. अनेक वेळा वाहन चालवणाऱ्या नागरिकांच्या मागे धावतात. लहान मुले, महिलांना देखील कुत्र्याची भिती पसरली आहे. अनेक नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा देखील घेतला आहे. त्यांचा लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी दिनेश यादव यांनी केली.


















