- सर्व जातीधर्मीय ५५ जोडप्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च) : पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव यांच्या वाढदिवसानिमिन आमदार महेशदादा लांडगे स्पोर्टस् फाउंडेशन व महापौर राहदादा जाधव स्पोर्टस फाउडेशन यांच्या वतीने सर्व जातीधर्मीय ५५ जोडप्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळा पारंपारिक रितीरिवाजानुसार रामायण मैदान, जाधववाडी, चिखली या ठिकाणी नियोजनबद्ध रितीने हजारो लोकांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात पार पडला.
सध्या महाराष्ट्रातील काही भागामध्ये जाणवणारी तीव्र पाणीटंचाई, दुष्काळ या गोष्टी लक्षात घेऊन सामाजिक संवेदना जपत महापौर राहुल जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व जातीधर्मीय ५५ जोडप्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षी ही वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून महाराष्ट्राच्या विविध भागातील गोरगरीब, मध्यमवर्गीय लोकांचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याप्रसंगी सर्व ५५ जोडप्यांचे कन्यादान हे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी व शिवांजली सखी मंचाच्या अध्यक्षा पुजाताई लांडगे, महापौर राहूल जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी व श्री दत्त दिगंबर नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा मंगलताई जाधव यांच्या हस्ते पार पडले.

विवाह सोहळयातील सर्व ५५ जोडप्यांना महापौर राहुलदादा जाधव स्पोर्टस् फाउंडेशनकडून संसारोपयोगी विविध वस्तू देण्यात आल्या. विवाह सोहळयातील बैठक व्यवस्था, भोजनाची व्यवस्था, काटेकोर नियोजन, लग्नप्रसंगी काढलेली भव्य दिव्य मिरवणूक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. सामाजिक जाणीव लक्षात घेऊन हा सर्व जातीधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा सुरक्षित, शिस्तीत, निर्विघ्नपणे पार पडण्याकरिता हजारो कार्यकर्ते स्वतः मनापासून अहोरात्र मेहनत घेत होते.
यावेळी महापौर राहुल जाधव व आमदार महेश लांडगे दोघेही सपत्नीक विवाह सोहळयास आलेल्या सर्व मान्यवरांचे व पाहुण्यांचे मन:पूर्वक स्वागत करत होते. याप्रसंगी लाखोंच्या जनसमुदायासह भोसरी विधानसभाआमदार महेश लांडगे, मंगलदास बांदल, जुन्नर विधानसभा आमदार शरद सोनवणे, अनाथाची माय सिंधुताई सपकाळ, मा. महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगरी, महापालिकेतील विविध समित्यांचे अध्यक्ष, सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका याप्रसंगी उपस्थित होते.











