- बुलेटस्वाराचा जागीच मृत्यू, दोघे जखमी; वाकडमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मार्च २०२३) :- रॉयल इनफिल्ड बुलेट (एम.एच.१४/के.एम.७७१८) वरील दुचाकी चालकाने वाहतूकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. गाडी ट्रिपल सिट, भरधाव वेगाने चालविली. समोरील यामा दुचाकीला (एमएच१२टीजी१९३७) धडक दिली.
सुमारे २०० फुट अंतर गाडी रस्त्यावर फरफटत पुढे गेली. अपघातात मित्र विकास शेळके हे गंभीर जखमी झाले. श्रीकृष्ण नारनाळे व यामा दुचाकीवरील चालक देवेंद्र कापसे हे किरकोळ जखमी झाले. आरोपी बुलेट दुचाकी चालकाचा अपघातात मृत्यू झाला. आरोपी स्वतःच्या मृत्युस व दोन्ही दुचाकीच्या नुकसानीस कारणीभुत ठरला. ही घटना (दि. ५) रोजी सकाळी ७.४० च्या सुमारास वाकड फाटा बाजुकडुन जगताप डेअरी चौकाकडे, वाकड फाटा बीआरटी बसस्टॉप जवळील रस्त्यावर, वाकड येथे घडली.
मयत आरोपी रॉयल इनफिल्ड बुलेटस्वार चालक किशोर हनुमंत जोगदंड (वय २८ वर्षे रा. साईलीला सोसा. गोडांबेचौक, रहाटणी) याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात २३३/२०२३ भादंवि कलम २७९,३३७, ३३८, ३०४(अ), ४२७ मो.वा.का. कलम १८४, ११९/१७७, १२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















