न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मार्च २०२३) :- घरी पायी चालत जात असताना फिर्यादी हे चर्च गल्लीतून बाहेर पडले असता आरोपी अनोळखी तिघांपैकी एकाने फिर्यादीला पाठीमागून पाण्याने भरलेला पिशवीचा फुगा फेकुन मारला. त्याबाबत फिर्यादीने आरोपींकडे विचारणा केली. ‘ कोणाला मस्ती आली, कोणी मला पाण्याने भरलेला पिशवीचा फुगा मारला, असे फिर्यादी त्यांना म्हणाले. आरोपींना त्याचा राग आल्याने त्यातील २० ते २५ वयोगटातील ग्रीन रंगाचा शर्ट घातलेल्या अनोळखी इसमाने फिर्यादीच्या कानशिलात मारली.
त्यावेळी दुस-याने धक्काबुक्की करीत लाथाबुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादीच्या ओरडण्याचा आवाज ऐकुण फिर्यादीचा मामा नितीन प्रभाकर पवार याच्या घरातुन फिर्यादीचे वडील हौसराव बचाटे हे फिर्यादीस वाचवायला आले. त्यावेळी काळा टी शर्ट घातलेल्या आरोपीने फिर्यादीच्या वडीलांवर कोयत्यासारखे दिसणारे हत्याराने वार केला. फिर्यादी त्यांच्या वडीलांना वाचवायलामध्ये पडले असता अनोळखी आरोपींनी फिर्यादीवर वार केला. तो वाचवण्यासाठी फिर्यादीने डावा हात वर केला असता फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ कोयत्यासारख्या दिसणा-या हत्याराने वार झाला. त्यानंतर अनोळखी आरोपी अॅक्टीव्हा व डीओ या मोपेड गाडीवर (गाडीचा नंबर माहित नाही) पळून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ४) रात्री ९.१५ च्या सुमारास काळेवाडी ते भारत माता चौक रस्त्यावर, शिलोह चर्च गल्लीच्या बाजुला काळेवाडी, येथे घडला.
फिर्यादी अभिषेक हौसराव बचाटे (वय २० वर्षे, धंदा-शिक्षण, श्रध्दा कॉलनी, ज्योतीबानगर, काळेवाडी) यांनी आरोपी तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी आरोपींच्या विरोधात २२९/२०२३ भादवि कलम ३२६, ३२३, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















