न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च २०२३) :- इंटरनेटवरील साईटद्वारे नोकरी शोधत असताना रजीस्ट्रेशन फॉर्म भरुन साईटवरील ९२३१२३८३४६२८ व्हॉटसअपवर फिर्यादीने मेसेज केला. आरोपीने टेलीग्रामवरून संपर्क साधण्यास फिर्यादिला सांगितले. टेलीग्रामवरुन फिर्यादीची १,३४,०१५ रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २५/०२/२०२३) सकाळी ११.०० पासुन ते सायंकाळी ४.४१ च्या सुमारास राहत्या घरी घडली.
फिर्यादी प्रकाश रमेश अडवाणी (वय ३९ वर्ष, रा. सदरगुरु निवास बिल्डींग, फ्लॅट नंबर ५, रिव्हर रोड, जुन्या एसबीआय बँकेच्या पाठीमागे, पिंपरी) यांनी आरोपी https://t.me/vasani15888 धारक अनोळखी व्यक्तीविरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी आरोपी विरोधात २७९ / २०२३, भा.द.वि कलम ४२०, ४०६ माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (क), ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.















