न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च २०२३) :- बांधकामाकरिता लागणाऱ्या साहित्याच्या साईटवर येणाऱ्या दोन गाडया अडवुन आरोपीने स्टोअर इनचार्ज, कामगार व गाडयावरील चालक व क्लिनर यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आरडाओरड करीत दहशत निर्माण करुन, शिवीगाळ दमदाटी केली. प्रत्येक गाडी खाली करण्यासाठी ५०,००० रुपये दयावे लागतील. नाहीतर गाडया खाली करु देणार नाही, असा धाक दाखवुन कमी भाडयात होणाऱ्या कामाचे जास्तीचे पैसे खंडणी स्वरुपात मागितले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ६) १२.०० वाजेच्या सुमारास सुस, ता. मुळशी, पुणे येथील व्हीटीपी स्कायलाईट टाऊनशिप साईटवर घडली.
फिर्यादी रविंद्र वाघु तुपे (वय ४६ वर्षे, धंदा नोकरी, रा. स. नं. ५४/१८, कुबेर प्रॉपर्टीज, ए ४०१, आंबेगाव (बु), पुणे) यांनी आरोपी दिनेश ससार (रा. सुस ता. मुळशी जि. पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी आरोपी विरोधात १८८/२०२३ भारतीय दंड संहिता कलम ३८७, ५०४, क्रिमिनल लॉ अॅमेंडमेंट अॅक्ट ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.















