न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२३) :- जुना पुणे- मुंबई महामार्गावरील सोमाटने फाटा येथे टोल नाका आहे. तो हटवण्याची मागणी सोमाटने टोल हटाव कृती समितीने केली आहे. त्यासाठी आज गुरुवारी तळेगाव बंदची हाक देण्यात आली. बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांनी दिला असून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून सोमाटने टोल नाका हटवण्याची मागणी संबंधित कृती समिती करत आहे. सर्वसामान्य नागरिकांची लूट करण्याचं काम आयआरबी करत असून तो टोल नाका हटवावा अशी मागणी सोमाटने टोल नाका कृती समितीने केली आहे. टोल हटावची मागणी पूर्ण न केल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील सदस्यांनी दिला आहे.












