न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२३) :- पिंपरी चिंचवड मधील सर्व नागरिकांनी “रानजाई” महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने २६ वे फुले,फळे, भाजीपाला, बागा, वृक्षारोपण स्पर्धा व भव्य प्रदर्शन “रानजाई” महोत्सव रंग, गंध, सृजनाचा
१० ते १२ मार्च २०२३ या कालावधीत महापौर निवासस्थान, निगडी प्राधिकरण येथे आयोजित केले आहे.
१० मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजता आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन होणार असून दुपारी १२ वाजता शशांक कोवाल
यांचा लाईव्ह बँड होणार आहे. सायंकाळी ५ वाजता व्याख्याते प्रदीप त्रिपाठी यांचे व्याख्यान आयोजित केले असून, सायंकाळी ६ वाजता माझी वसुंधरा पर्यावरण संवादक सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. सायंकाळी ७ वाजता आर जे अक्षय प्रस्तुत मनोरंजनाच्या विविध खेळांचे आयोजन केले आहे.
११ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता व्याख्याते रघुनाथ ढोले यांचे व्याख्यान आयोजित केले आहे तर सायंकाळी ५.३० वाजता कवी संमेलन ‘निसर्गाच्या कविता’, सायंकाळी ६.३० वाजता सिद्धांत कालमेघ यांचा लाईव्ह बँड, सायंकाळी ७.३० वाजता आर जे अक्षय यांच्या सोबत मनोरंजनाच्या विविध
खेळांचे आयोजन केले आहे. १२ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता आर जे अक्षय यांच्या सोबत मनोरंजनाच्या विविध खेळांचे कार्यक्रम आणि सायंकाळी ५ वाजता बक्षीस वितरण समारंभ आणि प्रदर्शनाचा समारोप होणार असल्याची माहिती उद्यान विभागाने दिली आहे.












