न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२३) :- वाकडवरुन (दि. ८) रोजी अकराच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ दुचाकीने कात्रजच्या दिशेने जात होता. मराठवाडा हॉटेल समोर, मुंबई बंगळुर, हायवे येथे पांढ-या रंगाच्या एका अनोळखी कार चालकाने त्याची कार वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगात चालविली. फिर्यादीच्या भावाच्या (एमएच१४केपी७८५४) दुचाकीला पाठीमागुन जोरात धडक देवुन गंभीर दुखापत केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. आरोपी त्यांच्या मृत्युस कारणीभुत ठरला.
अभिजित चंद्रकांत वाघमारे (वय ४९ वर्षे, रा. काळेवाडी फाटा, शिवतीर्थ नगर, थेरगांव) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. फिर्यादी अजित चंद्रकांत वाघमारे (वय ४६ वर्षे, धंदा रिक्षाचालक, रा. ८० रास्तापेठ, लोंखडेवाडा) यांनी आरोपी अनोळखी कार चालक याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात २१९ / २०२३ भादवि कलम ३०४ अ, २७९, ४२७, मो.व्ही. अॅक्ट कलम १८४, १३२ (१) (क). ११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.















