न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२३) :- दुकानात मंगळसुत्र काउंटरवर फिर्यादी या गि-हाईक पाहत होत्या. त्यावेळी तीन अनोळखी महिला या फिर्यादीच्या मंगळसूत्र काउंटरवर आल्या. सोन्याचे दागीने खरेदी करण्याचा बहाना आरोपी महिलांनी केला. फिर्यादी यांना दागीने दाखविण्यात व बोलण्यात गुंतवले. त्यांची नजर चुकवुन १,७५,००० रुपये किंमतीच्या सोन्याच्या वाट्या चोरी करुन नेल्या आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ४) रोजी रात्री ७.३० च्या सुमारास भांबुर्डेकर सराफ अॅण्ड ज्वेलर्स दुकान, चांदणी चौक, भोसरी या दुकानात घडला.
शितल सिताराम दळवी (शितल मयुर कांगणे) (वय ३४ वर्षे, धंदा सेल्समन, रा. अरुण धावडे यांचे बिल्डींगमध्ये दुस-या मजल्यावर, धावडे वाडा, महादेव मंदिराजवळ धावडे आळी भोसरी) यांनी तीन अज्ञात महिलांविरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी तिघींच्या विरोधात २११/२०२३ भा.द.वि. कलम ३७९, ३४ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.















