न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२३) :- फिर्यादीचा भाचा नागेश पवार याचा सह आरोपी ५, ६ व ७ यांच्याशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरला. सह आरोपी ६ याने मुख्य आरोपी याच्यासह इतर २ ते पाच व त्यांचे इतर ३ ते ४ मित्रांना बोलावून घेतले. सिमेंटच्या ब्लॉकने फिर्यादीच्या नाकावर, सुनिल डोंगरे याच्या डाव्या गालावर व सोमनाथ शिंदे याच्या डाव्या हाताच्या पंज्यावर, छातीवर मारुन सुनिल डोंगरे, सोमनाथ शिंदे यांना जखमी करुन फिर्यादीलाही गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ८). रोजी रात्री ९.३० च्या सुमारास बी.न,.१०, जय बजरंग हो सोसायटीचे पार्किंगमध्ये, अजंठानगर, चिंचवड येथे घडला.
फिर्यादी मरिअप्पा यकप्पा धोत्रे (वय ३२ वर्षे, धंदा नोकरी, रा. बी. १०, रुम नं. ०८,जय बजरंग हौ. सोसा. अजंठानगर, चिंचवड) यांनी आरोपी राजु ठोसर, विजय ठोसर, नाना कांबळे, अभिषेक मुकेश कांबळे (वय २२ वर्षे रा. रूम नं ७, माता अमृता कृपा सोसा, गती ट्रान्सपोर्ट समोर, अजंठानगर, चिंचवड), आंबु कांबळे, रोहित ज्ञानेश्वर दंडगुले (वय १८ वर्षे, रा. पत्राशेड, अजंठानगर, निगडी), साहिल रशिद पठाण (वय १८ वर्षे), सोन्या बगाडे, तुषार मुकेश कांबळे (वय २१ वर्षे, सर्व रा. अजंठानगर चिंचवड) व त्यांचे इतर ३ ते ४ मित्र यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
निगडी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात १४६ / २०२३ भा.द.विकलम १४३. १४४, १४७, १४८, १४९,३२६,३२४,५०४ नुसार गुन्हा दाखल करीत चौघांना गजाआड केले आहे.
















