न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२३) :- चित्रपट पाहण्यासाठी फिर्यादी महीला त्यांचे पती आणि भावसोबत (दि. ९) रोजी दुपारी २.५० च्या सुमारास सिटी प्राईड रॉयल सिनेमा, स्पॉट १८ मॉल, रहाटणी येथे चित्रपट पाहण्यसाठी गेल्या होत्या. चित्रपट सुरु होण्यापुर्वी त्या तिस-या मजल्यावरील महिलांच्या वॉशरुममध्ये गेल्या.
तेथील एका वॉशरुमच्या कंपार्टमेंटमध्ये त्या नैसर्गिक विधी करत असताना एक अनोळखी इसम कंपार्टमेंटमध्ये खालुन आत डोकाऊन फिर्यादीकडे पाहत होता. त्यावेळी त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. तसेच त्या घाबरुन ओरडल्या.
कंपार्टमेंटचा दरवाजा उघडला तोपर्यंत अनोळखी इसम तेथून पळुन गेला होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. महिला फिर्यादी यांनी आरोपी अनोळखी इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी अनोळखी इसमाच्या विरोधात २४१/२०२३, भा.दं.वि. कलम ३५४ (क) नुसार गुन्हा नोंदवला आहे.
















