न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकृत फायर सेफ्टी प्रमाणपत्र काढुन ते संस्थेच्या युजर आयडीने सी.बी.एस.सी. बोर्डाच्या https:\\saras.cbse.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करण्याचे काम फिर्यादीने आरोपीला दिले होते. परंतु, आरोपीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे बनावट फायर सेफ्टी प्रमाणपत्र तयार केले. फिर्यादी यांच्या हिंद चॅरिटेबल ट्रस्ट चिंचवड येथील एल्प्रो इंटरनॅशनल स्कुल या शैक्षणिक संस्थेची व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची फसवणुक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार एप्रिल २०२२ ते ३१ मे २०२२ दरम्यान घडला. फिर्यादी शिवप्रकाश श्यामसुंदर आसोपा (वय ३२ वर्षे, धंदा नोकरी, रा. स्वामी समर्थ हो सो, फ्लॅट नं ए/२३, लक्ष्मीनगर, चिंचवड) यांनी आरोपी अनिल मदान (रा. इंदोर, मध्यप्रदेश) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलिसांनी आरोपीच्या विरोधात १२० / २०२३ भादवी कलम ४२०, ४६५, ४७१, आयटी अॅक्ट ६६ (सी), ७३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















