न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२३) :- बस भरधाव वेगात चालवली. आरोपी बस चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हायगयीने निष्काळजीपणे रस्त्याने जाणाऱ्या पादचारी फिर्यादीच्या भावाला धडक दिली. त्यामुळे गंभीर जखमी होऊन फिर्यादीच्या भावाचा मृत्यू झाला. लालमणि जयस्वाल असे मयताचे नाव आहे. आरोपी बस चालक त्यांच्या मृत्युस कारणीभूत झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ९) रोजी सकळी ८.३० च्या सुमारास जुना एक्सप्रेस हायवे मुंबई लेनवर, सोमाटणे फाटा बाजुकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. फिर्यादी श्यामनाथ हरिगेन जैस्वार (वय ५६ वर्ष, धंदा नोकरी, रा. महात्मा फुलेनगर, एमआयडीसी रोड, वायसीएम हॉस्पिटलजवळ, भोसरी, मुळगाव जिवासडल, पो. स्टे बच्छवल, ता. मेहनगर, जि. आसामगड, उत्तरप्रदेश) यांनी आरोपी शैलेश शहाजी भोसले (वय ३२ वर्ष, रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात १२०/२०२३ भा.द.वि. कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ), मो.वा.का. कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















