न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२३) :- सहा वर्षीय चिमुकल्या मुलाचे अपहरण करणा-या ४५ वर्षीय आरोपीला चाकण पोलीसांनी गजाआड करीत अपहरण केलेल्या बालकाची सुखरूप सुटका केली आहे. पारख उमेश सुर्यवंशी (वय ६ वर्षे, रा. आगकरवाडी रोड, चाकण ता. खेड जि. पुणे) असे सुखरूप सुटका झालेल्या मुलाचे नाव आहे. सुरेश उर्फ सु-या लक्ष्मण वाघमारे (वय ४५ वर्षे, रा. पठारवाडी, चाकण, ता. खेड जि. पुणे; मुळ रा. देवघर वाकसाई ता. मावळ जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोकळया जागेत खेळत असताना अज्ञात इसमाने आगकरवाडी रोड, चाकण येथून (दि. २२) रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ७.०० च्या दरम्यान पारखचे अपहरण करून पळवून नेले होते. याप्रकरणी चाकण पोलीस स्टेशन येथे अश्विनी उमेश सुर्यवंशी (वय ३० वर्षे) यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा रजिस्टी नं २४२ / २०२३ भादवि कलम ३६३ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १ चे विवेक पाटील, सहा. पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे तसेच चाकण पोलीस स्टेशनचे वपोनि वैभव शिंगारे यांनी तपास पथकास अपहृत मुलाचा व आरोपीचा शोध घेण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार चाकण पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गुन्हयाचे घटनास्थळ, परीसरातील तसेच घटस्थळावर येणाऱ्या जाणा-या रस्त्यावरील सुमारे १०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यावेळी अपहृत बालकास सु-या नावाचा फिरस्ता इसम सोबत घेवुन जात असल्याचे दिसले. परंतु, सदर गुन्हयातील आरोपी सु-याचे नाव तसेच पत्ता व ठाव ठिकाणा याबाबत काहीच उपयुक्त माहिती मिळुन येत नव्हती. चाकण पोलीसांनी अपहृत मुलाचा व आरोपीचा फोटो प्रसार माध्यमांमध्ये, सोशल मिडीयावर प्रसिध्दीपत्रक तसेच पुणे, ठाणे, रायगड, अहमदनगर जिल्हयातील रेल्वे स्टेशन, बस स्थानकांमध्ये भिंतीपत्रके चिटकवुन आरोपी व अपहृत बालकाची माहिती मिळाल्यास पोलीसांना माहिती देण्याबाबत प्रसिध्दी दिली होती. तसेच सदर आरोपी व अपहृत मुलाबाबत गोपनीय बातमीदारांना माहिती दिलेली होती. तसेच चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकाने आरोपीबाबत लोणावळा येथे जावुन आरोपी व अपहृत बालकाचा शोध घेतला. तपास पथक सदर गुन्हयातील आरोपी व अपहृत मुलाचा कसोशीने शोध घेत असताना (दि. १०) रोजी वेहरगाव ता. मावळ जि. पुणे येथील पोलीस पाटील अनिल पडवळ यांनी सपोनि प्रसन्न ज-हाड व सफौ सुरेश हिंगे यांना माहिती दिली. गुन्हयातील अपहृत मुलगा व एक फिरस्ता इसम कार्ला येथे दिसत आहे. या माहितीच्या अनुषंगाने चाकण पोलीसांनी कार्ला येथुन अपहृत मुलगा पारख याला आरोपी सुरेश उर्फ सु-या लक्ष्मण वाघमारे याच्याकडुन ताब्यात घेतले आहे.
आरोपीस गुन्हयात अटक करण्यात आलेली असुन अपहृत मुलगा पारख यास सुखरूप त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. गुन्हयातील आरोपीबाबत कोणतीही उपयुक्त माहिती नसताना चाकण पोलीस स्टेशनकडील तपास पथकाने जुन्या पारंपारीक पध्दतीचा व बातमीदारांकडुन मिळालेल्या माहितीचा उपयोग करून आरोपीस ताब्यात घेवुन अपहृत मुलाची आरोपीच्या ताब्यातुन सुखरूप सुटका केलेली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त, विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ विवेक पाटील, सहा. पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, विक्रम गायकवाड, सुरेश हिंगे, पो हवा राजु जाधव, संदिप सोनवणे, पोना हनुमंत कांबळे, निखिल शेटे भैरोबा यादव, पोकॉ / नितीन गुंजाळ, निखील वर्पे, अशोक दिवटे, प्रदिप राळे, सुनिल भागवत, चेतन गायकर यांनी केलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि प्रसन्न ज-हाड हे करीत आहेत.
















