न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२३) :- रुपीनगर येथील सरस्वती शाळेजवळ अज्ञात तीन जणांनी पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. तिघांनी कोयत्याने सात ते आठ गाड्यांच्या काचा फोडल्या. त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
हातात कोयते घेऊन तिघांनी दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
















