- उद्धव ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्या वतीने आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२३) :- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या रहाटणी-काळेवाडी विभागाच्या वतीने शिवजयंती, तुकाराम बीज व जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आदर्श मातांचा तसेच वारकरी संप्रदायातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. उपशहरप्रमुख हरेश नखाते यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी बाल शिवशाहीर परमवीर आव्हाड यांनी पोवाडा गायन केले.
यावेळी उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादीचे नेते नाना काटे, ह.भ.प. शेखर महाराज जांभुळकर, ह.भ.प. तुकाराम महाराज हापसे, शिव व्याख्याते निलेश मरळ, दस्तगीर मनियार, उद्धव ठाकरे गटाचे आजी माजी पदाधिकारी, हरेश आबा नखाते मित्र मंडळ, पवना हेल्थ क्लब आणि जय हरी ग्रुपचे सभासद उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते भामाबाई वामन काळे, सुशीला हिरामण नढे, गयाबाई महादेव पगारे, पारुबाई दत्तात्रय विटकर, पुष्पा खैरे, ज्योती कैलास वाल्हेकर, सखुबाई लक्ष्मण मंजाळ, रतन अशोक जाधव, रहमान साहेब लाल शेख, सिंधुबाई हिरामण नखाते, स्मिता पांडुरंग अंकुशे या आदर्श मातांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच वारकरी संप्रदायातील आप्पा महाराज पायगुडे, गायनाचार्य धोंडिबा कोतवाल, बाळासाहेब सांगोले, रामचंद्र काळे, तुकाराम महाराज हापसे, प्रभाकर गवारे, पद्माकर जांभळे, सुखदेव खेडकर, सुरेश विटकर यांचा सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, दिवाळीमध्ये हरेश नखाते यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्यांनाही यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रताप रामचंद्र राऊत द्वितीय क्रमांक क्रांतिवीर मित्र मंडळ व तृतीय क्रमांक श्रीनाथ मित्र मंडळाने पटकावला.















