न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२३) :- कुटुंबाचा मालकी हक्क व ताबा वहिवाटीमधील थेरगाव गावठाणातील सव्हें नं ४/९ व ४/१६ अनुक्रमे ४१ गुंठे व ५६ गुंठे जमिनीचा आरोपी महिलेने अज्ञात इसमाशी संगणमत करून बनावट नकाशा तयार केला. त्याआधारे जमिन लागु सर्व्हे नं. ४/१७ मधील असल्याचे भासवुन, लोकांना नोटरी दस्त करुन विक्री केली. त्या मोबदल्यात लोकांकडुन मोठया प्रमाणात पैसे घेवुन त्यांची फसवणुक केली आहे. तसेच फिर्यादींनी यापूर्वी सदर जागेची मोजणी करुन गाडलेल्या खुणा काढुन कोठेतरी विल्हेवाट लावली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार जानेवारी २०२१ ते आजपर्यंत थेरगाव गावठाणमधिल सर्व्हे नं ४/९ व ४/१६ येथे घडली.
फिर्यादी शांताराम श्रीपती जगताप (वय ६७ वर्षे, धंदा सुखवस्तु, रा. तथागत निवास, जगताप नगर लेन नं. १, थेरगाव) यांनी महीला आरोपी (रा. जगतापनगर, लेन नं. ७, थेरगाव गावठाण) च्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी आरोपीच्या विरोधात २४५ / २०२३ भा.द.वि. कलम ४२०, ४१७, ४६४, ४६५, ४६८, ३७९ गुन्हा दाखल केला आहे.


















