- दुसऱ्याच्या शेत जमिनीत लावले गांजाचे झाड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२३) :- बो-हाडेवाडी, मोशी येथील वुडसविल फेज ३, युनिक किड प्रि स्कुलच्या मागील बाजुस जमिन गट नंबर ७४१, कुमार फर्निचर इंडस्ट्रीज शॉपच्या पत्र्यालगत पाण्याचे टाकीच्या आडोशाला सचिन भिकोबा ओझरकर यांच्या मालकीच्या शेत जमिनीत आरोपीने गांजाच्या झाडाची बेकायदेशिररित्या लागवड केली.
२८३ सेंमी उंचीचे एकुण ७८,४७५ रुपये किंमतीचे ३ किलो १३९ ग्रॅम वजनाचे हे झाड आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी (दि. ११) सकाळी ११.५० च्या दरम्यान कारवाई करीत आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्यावर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ८९ / २०२३ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (ब), २० (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हस्तीमल रत्नाराम लोहार (वय ३० वर्षे, रा. पंडीत यांचे खोलीमध्ये, बो-हाडेवाडी, मोशी; मुळगाव नौसरावावडी ता. आहौर, जि. जाल्लोर, राज्यस्थान) असे अटक आरोपीचे नाव आहे.















