न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२३) :- मयत पत्नीने आरोपी पतीला मुलगा अभिजीत (वय ७ वर्षे) याच्यासह मुळगावी सांगली येथे जाण्यास नकार दिला. त्यावरुन फिर्यादीची मयत मुलगी आरोपीची पत्नी आणि आरोपी पती या दोघांमध्ये भांडण झाले. त्याचा राग मनात धरून आरोपी पतीने पत्नीच्या पोटात चाकु भोसकून तसेच तिच्या पोटावर वार करून तिला जिवे ठार मारले आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. ११) रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास पर्सिस्टन्स कंपनीसमोर, हिंजवडी या ठिकाणी घडली.
फिर्यादी कमल गोपीचंद राठोड (वय ५५ वर्षे, धंदा-गृहीणी, रा-सी/ओ राजु बुचडे यांची चाळ, राजयोग पेट्रोल पंपाच्या मागे, मारुंजी; मुळ गाव टोकवाडी, पो. अलोस, ता मंठा, जि.जालना) यांनी मयत मुलीचा आरोपी पती नामदेव वालचंद राठोड (वय ४२ वर्षे, रा मु.पो धुळकरवाडी, ता-जत, जि-सांगली) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी २३० / २०२३ भा.द.वि. कलम ३०२ म.पो. का. का ३७ (१) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीला ताब्यात घेतले आहे.















