न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२३) :- बाथरुममध्ये अंघोळ करत असताना आरोपीने चोरुन फिर्यादीचा व्हिडीओ मोबाईलमध्ये शुट केला. फिर्यादी महिलेची बदनामी करण्याकरिता आरोपीने तो व्हिडीओ त्याच्या गर्लफ्रेंडच्या व्हाटसअॅपवर शेअर करीत फिर्यादीची बदनामी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १०) रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास रुमं नं. २०८, हॅलो वर्ल्ड इलिमेंट, गुरुकृपा हॉस्पिटल, मांरुजी रोड, हिंजवडी येथे घडली.
महिला फिर्यादी यांनी आरोपी आकाश लवानिया (रा. रु. नं. २०५, हॅलो वर्ल्ड इलिमेंट, गुरुकृपा हॉस्पिटल, मांरुजी रोड, हिंजवडी), महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्यात पोलिसांनी २३१/२०२३ भादंवि कलम ३५४ (क), सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ई) अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल केला असून महिला आरोपीला अटक केली आहे.















