न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२३) :- मुकेश किराणा स्टोअर (फिनेक्स हॉस्पीटल शेजारी, संभाजीनगर, काळेवाडी फाटा थेरगाव) आणि श्री गणेश ट्रेडींग (पवारनगर काळेवाडी फाटा, थेरगाव) या दोन्ही दुकानात दोघा आरोपींनी आयटीसी कंपनीच्या नावे बनावट गोल्ड फ्लेक सिगारेट विक्क्रीसाठी ठेवली. कॉपीराईट नियमांचा भंग केला. तब्बल ८५,८०० आणि ९९०० रुपये किंमतीचे कॉपीराईट गोल्ड फ्लेक सिगारेट आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी तयार केली. आरोपींनी एकुण ९५,७०० रुपये किंमतीचा माल विक्री करीता जवळ बाळगला.
आयटीसी कंपनीचे विक्री प्रतिनिधी फिर्यादी यांच्या (दि. ११) रोजी सायंकाळी ५:३० ते ७:३० च्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला. फिर्यादी अमोल चंद्रशेखर बहुलेकर (वय ४३ वर्षे, धंदा नोकरी, रा. फ्लॅट नंबर ३३/११, जेल ऑफीसर सोसायटी, विमाननगर) यांनी आरोपी मोहनलाल गोमाजी भाटी (वय ५१ वर्षे, रा. फिनोक्स हॉस्पीटल शेजारी, संभाजीनगर काळेवाडी फाटा, थेरगाव), गणेश सुवालाल गांधी (वय ३४ वर्षे रा. पवारनगर गल्ली नंबर ३ थेरगाव) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी २४७/२०२३ भादवि कलम ४१७,४८२, ४८३, ४८६ ट्रेडमार्क अॅक्ट १९९९ चे कलम १०३, १०४ कॉपी राईट अॅक्ट १९५७ चे कलम ६३ नुसार दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी जामिनावर आहे.















