न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२३) :- सायकल घेण्यासाठी फिर्यादीचा मुलगा फिर्यादीच्या पत्नीसोबत पायी जात होता. दरम्यान आरोपीची बंगल्याची भिंत मोडकळीस आली होती. त्यामुळे एखादया व्यक्तीचा जीव जावु शकतो, हे माहीत असतानासुध्दा आरोपीने त्याकडे दुर्लक्ष केले. मोडकळीस आलेली भिंत अंगावर पडून फिर्यादीचा नऊ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
मोहीतराजे अमित भोसले (वय ९ वर्षे) असे मृत्यू झालेल्या फिर्यादीच्या मुलाचे नाव आहे. आरोपी हा मुलाच्या मुत्यूस कारणीभुत झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. १२) रोजी दुपारी २.१० च्या सुमारास महादेव मंदिराजवळ, रोकडे वस्ती, चिखली गावठाण चिखली येथे घडली.
फिर्यादी अमित कांतीलाल भोसले (वय ४० वर्षे, धंदा नोकरी, रा. गट नंबर ८८२, देहु आळंदी रोड, चिखली गावठाण, चिखली) यांनी आरोपी सुरेश विठ्ठल जाधव (रा. स्पाईन रोड चिखली) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी आरोपीच्या विरोधात १६३/२०२३ भा.दं.वि कलम ३३८,३०४(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.















