- स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांची महावितरणाकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२३) :- चिखली, कुदळवाडीतील विद्युत पुरवठ्यामधील व्यत्यय अडचणीचा ठरत आहे. नागरिकांना प्रचंड उन्हाळ्यात विज नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महावितरण कंपनीने तातडीने रहिवासी भागांसाठी स्वतंत्र विज वाहिन्यांची व्यवस्था करावी.
अखंडित विज पुरवठ्यासाठी येथील नाल्यावर नवीन २०० kva ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा, अशी लेखी मागणी फ प्रभागाचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता भोसले यांच्याकडे केली आहे.
कुदळवाडी चिखली परिसरातील सर्व भागात वारंवार विजपुरवठा खंडित होत आहे. त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात नागरिकांना, लघु उद्योजकाना होत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वेळेवर बील भरणारे नागरिक महावितरणमुळे हैराण झाले आहेत, असे यादव यांनी म्हटले आहे.















