न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च २०२३) :- मारुंजी येथील मदरसन कंपनीत काम करणाऱ्या फिर्यादीला आरोपीने (दि. १३) रोजी रात्री ८ च्या सुमारास बाथरूमजवळ बोलावुन घेतले. ‘ तु प्रिती सोळंके हिला माझ्याविषयी काय सांगितले, त्यावरुन ती मला चारचौघात वाईट बोलली ‘ असे आरोपी फिर्यादीला म्हणाला. त्या कारणावरुन फिर्यादीला आरोपीने लोखंडी रॉड हातात घेवुन डाव्या पायाच्या मांडीवर, पाठीमागील बाजुस दोन तिन वेळा मारुन जखमी केले. तसेच शिवीगाळ करुन हाताने देखील मारहाण केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी प्रवीण संदीपान माने (वय २४ वर्षे, धंदा-नोकरी, रा. पंचनाथ मंदीर, पाचपिर चौक, काळेवाडी) यांनी आरोपी मदन बाळु गायकवाड (वय २७ वर्षे, रा प्रथम वारभवन रुम, सम्राट चौक, वाकड) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात २३९/२०२३ भा.द.वि. कलम ३२४, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


















