न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च २०२३) :- नवमहाराष्ट्र शाळेजवळ गौरव चायवाल येथे झालेल्या किरकोळ वादातून आरोपी चौघांनी (दि. १२) रोजी रात्री ११.३० च्या सुमारास फिर्यादीचा मित्र अक्षद हजारे याला फोन करुन फिर्यादीला छोटी मस्जिद, पिंपरी येथे बोलावुन घेतले. आरोपीने फिर्यादीला वाईट वाईट शिवीगाळ करीत हाताने मारहान केली. तसेच फिर्यादीला मारहान करत असताना सह आरोपी २ याने त्याच्या हातातील कशाच्यातरी सहाय्याने फिर्यादीच्या डोक्यात मारुन फिर्यादीला जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. १२) रोजी रात्री ११.२० च्या सुमारास छोटी मस्जिद मिलिंदनगर, पिंपरी येथे घडली.
फिर्याद तौफिक चाँद शेख (वय १७ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. बालामन चाळ, पिंपरीगाव, नव महाराष्ट्र शाळेमागे, पिंपरी) यांनी आरोपी शुभम रोकडे (वय अंदाजे २० वर्षे, पुर्णनाव माहीत नाही), अक्कु भोरे (वय अंदाजे १९ वर्षे, पुर्णनाव माहीत नाही), विशाल आहीरे (वय अंदाजे २४ वर्षे अंदाजे, पुर्णनाव माहीत नाही), अनिकेत उर्फे अंड्या गायकवाड (वय १९ वर्षे अंदाजे, सर्व रा. मिलिंदनगर पिंपरी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात २९४ /२०२३ भा.द.वि कलम ३२४, ३२३, ५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.















