न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च २०२३) :- औंध डी मार्ट रस्त्यावरील मुळा नदी ब्रिजजवळ, सांगवी वाहतूक पोलीस ऑफिसजवळ रस्त्याच्या कडेला (दि. १३) रोजी दु. १२.३० च्या सुमारास आरोपीने टीव्हीएस ज्युपीटर मोपेड (एमएच१२एलएस९१९२) वर ६८,००० किंमतीचे १७ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ बेकायदेशिररित्या विक्रीसाठी जवळ बाळगले. सांगवी पोलिसांनी कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्यावर ९५/२०२३ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क). २२ (ख) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून ६०,००० रुपये किंमतीची मोपेड आणि अमली पदार्थ असा एकूण १,२८,००० रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.
बनकोले युसुफ ओओलाबी (BANKOLE YUSUF OWOLABI वय २४ वर्षे, रा.मोरया पार्क, सांगवी, मुळगाव ए, नंबर २, ओशीडी लोगोस, नायजेरिया) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.















