न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च २०२३) :- स्टेट बँक ऑफ मॉरेशसचे सालिस व्हीजा प्लॅटीनियम क्रेडीट कार्ड बंद करण्यासाठी फिर्यादीने मोबाईलमधील गुगलवरुन स्टेट बँक ऑफ मॉरेशसचा नंबर सर्च करून त्यावर फोन केला. आरोपी ७७१८३२०९९५ या मोबाईल धारकांनी फिर्यादीला ओटीपी शेअर करण्यास सांगितले. त्यावेळी फिर्यादीच्या क्रेडीट कार्डवरुन एकुण १,३२,८५८ रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ४/१२/२०२१) रोजी दुपारी १.०० ते २ च्या दरम्यान सर्वे नं. १२५, रेणुका तुलसी फेज २. बिल्डींग डी. फ्लॅट नं. ३०२ वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली.
फिर्यादी चेतन रविंद्र वाणी (वय ३५ वर्षे, धंदा-नोकरी, रा. सर्वे नं. १२५, रेणूका तुलसी फेज २, बिल्डींग डी. फ्लॅट नं. ३०२, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी आरोपी मो.नं. ७७१८३२०९९५ धारक याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी १२७/२०२३ मा द वी कलम ४२०, ४६५, ४७१, आयटी अॅक्ट – ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.















