न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२३) :- राहत्या घरी आरोपीने फिर्यादीचे अंघोळ करतानाचे अर्धनग्न फोटो काढले. गच्चीवर बोलावुन हे फोटो फिर्यादीला आरोपीने दाखविले. त्या आधारे ब्लॅकमेल करीत ‘ तु माझ्याशी शारीरीक संबंध ठेव, नाहीतर मी तुझे फोटो तुझ्या नव-याला दाखवील व व्हायरल करील ‘ अशी धमकी दिली. फिर्यादी महिलेला लॉजवर वारंवार नेवुन तिच्या संमतीशिवाय जबरदस्तीने फिर्यादी महिलेशी शारीरीक संबध ठेवले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हि घटना (दि. २९ /०३/२०२० रोजी सायंकाळी ६.०० ते दि. २/०३/२०२३ रात्री १०.००) च्या दरम्यान वेळोवेळी मोई व भोसरी, इंद्रायनीनगर येथील लॉजवर घडली. फिर्यादी महिलेने आरोपी निलेश आमृत मोरे (वय ३० वर्षे, रा. मोई, ता. खेड जि पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ८६/२०२३ भादवि कलम ३७६ (२) (एन) ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
















