न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२३) :- पासपोर्ट व व्हिसाची वैधता संपलेली असतानाही बांग्लादेशी नागरिक पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्य करताना निदर्शनास आला. त्याने भारतीय नागरिकांना देय असलेले आधारकार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड यांच्या छायांकित प्रती अवैधरित्या प्राप्त केल्याचे तपासात आढळले.
कालीपाडा विनोदचंद्र सरकार (वय ३५ वर्ष, रा. मधुबन कॉलनी नं. ३, डॉल्फिन इंटरनॅशनल स्कुल, जुनी सांगवी; मुळ रतनपुर, विरामपुरवाना, जिल्हा दिनाजपुरदेश, बांग्लादेश) असे अटक आरोपी विदेशी नागरिकाचे आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या परकिय नागरिक नोंदणी विभाग, विशेष शाखा २ यांनी सांगवी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात ९९ / २०२३भा.द.वि. कलम ४२०, ४६८, ४०१ व विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १४ नुसार गुन्हा दाखल केला आहे असून आरोपीला अटक केली आहे.