न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२३) :- पैशाच्या व्यवहारावरून फिर्यादीच्या ऑफीसमध्ये येवुन आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ, मारहाण केली. जबरदस्तीने कारमधुन हिंजवडी येथे नेले. तिथे शिवीगाळ व मारहण करून ५००० रुपये व रोख ३४६०० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. फिर्यादीच्या हातातील हिरेजडीत चांदीच्या ४ अंगठ्या, आयसीआयसीआय बँकचे क्रेडीट कार्ड काढुन घेतले. फिर्यादीच्या भावाच्या नावे असलेली मारुती सुजुकी कंपनीची इको कार (एमएच१४एचके८१७७) ताब्यात घेवुन कारच्या पेपरवर फिर्यादीला मारण्याची भिती घालुन सही करून घेतली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २४/०१/२०२३) रोजी दुपारी ३.०० ते रात्री १०.३० च्या दरम्यान दोंदेकर ऍग्रो सोल्युशन प्रा.लि., ऐलोरा शॉपींग सेंटर, इंद्रायणी नगर, भोसरी व हिजंवडी येथील गॅरेजवर घडली.
फिर्यादी विकास महादु दरवडे (वय ४५ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. मु.पो. उढाणे स्थळ, दोंदे, ता. खेड, जि. पुणे) यांनी आरोपी राजेंद्र बाबुराव निकम (वय ३८ वर्षे, धंदा नोकरी, रा. २०२, महादेव काटे यांची बिल्डींग, लक्ष्मी हाईटस, जांभुळकर जिम समोर, हुलावळे वस्ती, हिंजवडी) व त्याचे दोन अनोळखी साथीदार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी तिघांच्या विरोधात २२३/२०२३. भा.दं.वि. कलम ३५४(अ).३८४,५०४, ५०६,३२३,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


















