न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२३) :- अल्पवयीन १५ वर्षीय मुलगी आणि आरोपी दोघांचे प्रेम संबंध होते. आरोपीने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो त्याच्या मोबाईलमध्ये काढले. त्याने फिर्यादीकडे पैशाची मागणी केली. ‘पैसे नाही दिले तर फोटो व्हायरल करेल’ अशी धमकी दिली. आरोपीने फिर्यादीकडुन गुगल पे द्वारे पाच हजार रुपये स्वीकारले. फिर्यादीच्या मुलीच्या इच्छेविरुदध तिच्या राहत्या घरी कोणीही नसताना जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. तसेच फिर्यादीच्या मुलीचे व स्वतःचे अश्लील फोटो स्नॅपचॅटवरुन फिर्यादीला पाठवले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २८/०२/२०२३) सकाळी ९.०० ते आजपावतो भानूदास घोगरेची रूम, गवारवाडी येथे घडला. ३२ वर्षीय महीला फिर्यादी यांनी आरोपी रोशन कैलास चव्हाण (वय २५, रा. भानुदास घोगरेची रुम, गवारवाडी, फेज-३, माणगाव, मुळशी, पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात २४५/२०२३ भा.द.वि.क. ३५४ अ, ३७६ (२) आय, ३८४, ५०६ बालकांचे लैंगिक अपराधापासून बालकाचे सरंक्षण अधि २०१२ चे क ३,४,७,८माहिती तंत्रज्ञान अधि २००० चे क ६७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















