न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२३) :- कुरुळीतील महिंद्रा लॉजेस्टीक या कंपनीत फिर्यादी हे मॅनेजर म्हणून नोकरीस आहेत. आरोपी अमोल उत्तमगंजे हा या कंपनीमध्ये विराज एन्टरप्रायजेस या कॉन्ट्रॅक्टमधील कामगार आहे.
महिंद्रा हेवी इंजिनि लि. कंपनीने महिंद्रा लॉजेस्टीक कंपनीच्या गोडावूनमध्ये त्यांचे बॉश कंपनीचे ५०,७१,५०३ रुपयांचे ७६८ बॉश इजेक्टर ठेवले होते. महिंद्रा हेवी इंजिनि लि कंपनीच्या मालाचे रिसिव्हींगचे व डिस्पॅचचे काम करणारा कॉन्ट्रॅक्टमधील कामगार आरोपी अमोल उत्तमगंजे याच्या ताब्यात त्या वस्तू दिल्या होत्या. आरोपीने त्या मालाचा (दि. ३१/१२/२०२२) सायंकाळी ५.३० ते (दि. १७/०१/२०२३) सायंकाळी ५.३० च्या दरम्यान महिंद्रा कंपनीचा विश्वासघात करुन स्वतःच्या फायदयासाठी अपहार केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी अमित विरबहादुर सिंग (वय ४५ वर्षे, धंदा नोकरी, रा. सिलव्हर सिटी, डी विंग फ्लॅट नंबर- ६०१. जाधववाडी, चिखली) यांनी आरोपी अमोल उत्तमगंजे (वय ३० वर्षे, रा. महाळुगे इंगळे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
महाळुंगे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ९९/२०२३ भादवि कलम ४०८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















