- अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू; कार चालकावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२३) :- वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करुन चाकणकडून तळेगावकडे भरधाव वेगात जाणा-या अज्ञात वाहनाला आरोपीच्या टीयुव्ही चारचाकी कार (एमएच४६एएक्स११४९) या वाहनाने ओव्हरटेक केले. बजाज इलेक्ट्रीकल कंपनीकडून महाळुंगे गावाच्या दिशने जाणाऱ्या स्कुटी (एमएच१४एफव्ही८९१५) ला धडक दिली. त्यात फिर्यादी हे जखमी आणि फिर्यादीचे मित्र गंभीर जखमी झाले.
अपघातात फिर्यादीच्या मित्राचा मृत्यू झाला. ऋतिक आनंत मुसळे (वय २१ वर्षे) असे फिर्यादीच्या मयत मित्राचे नाव आहे. आरोपी कारचालक त्यांच्या मृत्त्यूस कारणीभूत ठरला. हा अपघात (दि. १८) रोजी रात्री ७:३० च्या सुमारास चाकण-तळेगाव दाभाडे रोडवर, महाळुंगे गावच्या हद्दीत ल्युमॅक्स कंपनीजवळ घडला.
फिर्यादी अशिष सुरेंद्रसिंह (वय २३ वर्षे, रा. महाळुंगे कमानीजवळ, राजु पुर्णनाव माहित नाही यांचे रुममध्ये भाडयाने, महाळुंगे, ता. खेड, जि. पुणे; मुळगाव ग्रामपोरठ, ता. सेवरीया, जि. रिवा, मध्येप्रदेश) यांनी आरोपी टी. यु.डी. चारचाकी (एमएच४६एएक्स११४९) वरील चालक याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात १०२ / २०२३ भा.दं.वि.सं. कलम ३०४(अ), २७९, ३३७,३३८, मो. वा. का. कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.