न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२३) :- पत्नीसोबत फिर्यादी हे पिंपरी भाजी मंडई येथे भाजी विक्री करत होते. त्यावेळी आरोपी दोघांनी फिर्यादीकडे दारु पिण्यासाठी ५०० रुपयांची मागणी केली. फिर्यादीने त्यास माझ्याकडे आत्ता तुला देण्यासाठी पैसे नाही, असे सांगीतले. त्यावरून “ ऐ मादचोद मला पैशे दे, नाहीतर तुला खल्लास करुन टाकील, तुला उदयापासुन भाजी मंडई येथे भाजी विकु देणार नाही ” असे म्हणुन कमरेला लावलेला कोयता काढुन फिर्यादी यांना धाक दाखवुन गल्ल्यातील पाचशे रुपये बळजबरीने काढुन नेले.
त्यावेळी सह आरोपी २ याने फिर्यादी यांना ” तु आम्ही पैशे घेतले या बाबत कोणास काही एक सांगीतले तर तुझे हात पाय तोडुन टाकील ” अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. हि घटना (दि. १९) रोजी रात्री ७.३० च्या सुमारास पिंपरीतील एस. चिकण सेन्टर समोर घडली.
फिर्यादी आण्णा रामा अडागळे (वय ४० वर्षे, धंदा भाजी व्यवसाय, रा. आदिनाथ कॉलनी, एकशिंगी चाळ, धनगरबाबा मंदिरासमोर, काळेवाडी) यांनी आरोपी हर्ष अमर बोहत ऊर्फ लडया (वय अंदाजे १८ वर्षे, रा. सेनेट्री चाळ, पिंपरी पुणे १८), अल्पवयीन आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ३२१/२०२३ भा.द.विकलम ३९२, ५०६,४२७,३४ आर्म अॅक्ट कलम ४ (२५) क्रि. लॉ. अमेन्टमेन्ट अॅक्ट कलम ३,७ नुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















