न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२३) :- आयसीआयसीआय बँकेचा मॅनेजर असल्याचे फिर्यादीला भासवले. लोन ईएमआयबाबतची शंका दूर करण्यासाठी फिर्यादीचा विश्वास संपादन करून एनी डेस्क नावाचे स्क्रिन शेअरिंग अॅप्लीकेशन डाउनलोड करण्यास भाग पाडले. फिर्यादी यांच्या बँक खात्याचा इंटरनेट बँकिंग लॉगईन आयडी व पासवर्ड संगणकिय साधनाद्वारे प्राप्त केला. फिर्यादीच्या बँक खात्यातून रु २४,००० रक्कम काढून घेतली. तसेच फिर्यादीच्या नावाने आयसीआयसी बँकेचे २,००,००० रक्कमेचे लोन परस्पर मंजूर करुन घेतले. ही रक्कम देखिल फिर्यादीच्या परवानगीशिवाय परस्पर वळती करुन फिर्यादी यांची एकूण २,२४,००० रुपयांची आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. २७/०२/२०२२) दुपारी २.४८ च्या सुमारास संगणकिय साधनाद्वारे, लांडेवाडी, भोसरी येथे घडली. फिर्यादी कृष्णा बालाजी रोडगे (वय ३४ वर्ष, नोकरी, रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी आरोपी मोबाईल क्र. (९३३९५३७२९१) चा वापरकर्ता इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात २३९ / २०२३. कलम ४१९, ४२० भा.दं.वि. सह कलम ४३, ६६, ६६ (सी), ६६ (डी) अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
















