न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२३) :- पार्ट जॉब देतो. त्यामध्ये युटयुबवरील व्हिडीओ लाईक केल्यानंतर पैसे खात्यात जमा होतील, असे फिर्यादीला अनोळखी मोबाईलधारकाने सांगितले. वेगवेगळया लिंक शेअर केल्या व त्या त्यांनी लाईक केल्या. त्यावेळी त्यांच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले. फिर्यादी यांना पुर्णपणे आरोपीने विश्वासात घेतले. त्यांनतर त्यांनी त्यांच्याकडे आणखी काही टास्क आहेत, ते तुम्ही पुर्ण केल्यानंतर तुमच्या खात्यात टास्क पुर्ण केल्यानंतर टास्कप्रमाणे पैसे जमा होतील, असे सांगितले.
सांगितल्याप्रमाणे फिर्यादी यांनी टास्क पुर्ण केल्या. पंरतु त्यांनंतर ते आणखी टास्क पुर्ण करावे लागतील तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील, असे खोटे सांगुन फिर्यादीची एकुण २१,९५,०२० रुपयांची आर्थिक फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २२) रोजी दुपारी ४.२६ ते अदयापपर्यंत आईसाहेब बिल्डींग, फ्लॅट नं. ३०८, हिराई सिताई बिल्डींग, वाकड येथे घडला.
महिला फिर्यादी यांनी याप्रकरणी आरोपी अनोळखी मो. धारक क्र. ९९८९९८९६१२५८, Alyana from Global Chat Company, +२७७६२२४९५६१ Shammi recruter from allegis service india pvt ltd यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी २७४ /२०२३ भादवि कलम ४१९, ४२०, ४०६ भादवि सह कलम ६६ (सी), ६६ (डी) माहीती तंत्रज्ञान कायदा अन्वये आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.