न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२३) :- वार्षिक क्लोजिंगच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व बँक शाखा ३१ मार्चपर्यंत सलग सुरू राहणार आहेत. या काळातील बँकांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बँका रविवारीही सुरू राहतील.
रिझर्व्ह बँकेने आदेशात म्हटले आहे की, २०२२-२३ हे वित्त वर्ष ३१ मार्चला संपत आहे. या तारखेपर्यंत सरकारशी संबंधित सर्व व्यवहार पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी बँका सलग सुरू ठेवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर (एनईएफटी) आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) यंत्रणेद्वारे होणारे व्यवहारही ३१ मार्च रोजी १२ वाजेपर्यंत सुरू राहतील. सरकारी धनादेशांच्या संकलनासाठी ‘स्पेशल क्लिअरिंग व्यवस्था करण्यात आली आहे.